Prompt
जेव्हा केली तुला नवरी
गडबड खूप भारी झाली
माझं हृदय गेलं चोरी
तुझ्या हातात दिली माझ्या आयुष्याची दोरी
ए मोहिनी ऐकते ना ग माझी चिमणी
हळवी ती माझी राणी
नाही बोललो नीट मी तर
कशी रडते ती माझी हरीनी
डोळा भरून आणते पाणी
आणि बोलते तुम्हीच माझ्या आयुष्याचे धनी
ए मोहिनी
माझ्या चिमणीला नकोय एक्सपेन्सिव्ह गिफ्ट
एक चहा आणि गोड गोष्टी मध्ये आहे ती खुश
ए मोहिनी ऐकते ना ग
माझी चिमणी हळवी ती माझी राणी
किती पण पाहू दे पोरगी चड्डीवाली
इथे ऑकलंडमध्ये फक्त तुझीच आठवण आली
जरी करता येत नसल्या एक्सप्रेस
मनातील भावना खुलून तरी हृदयात मात्र एकच तू भरून
ए मोहिनी ऐकते ना ग
माझी चिमणी हळवी ती माझी राणी
तुझ्या डोळ्यात आहे जणू काही चुंबकाचे बळ
माझे मन ओढले जाते नेहमी तुझ्याजवळ
जेव्हा येते तू राणी साडीमध्ये टिकली लावून सजून
माझ्या काळजाचं होतं पाणी पाणी तुझ्या रूपाकडे बघून.
ए मोहिनी ऐकते ना ग
माझी चिमणी हळवी ती माझी राणी
हा मारुती झाला आहे ठार वेडा तुझ्या ह्या प्रेमात
देशील ना ग राणी माझी साथ सर्व सात जन्मात
ए मोहिनी ऐकते ना ग
माझी चिमणी हळवी ती माझी राणी